Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी शहीद भगतसिंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त केले अभिवादन


नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शहीद भगतसिंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

आपल्या दुर्दम्य साहस आणि शौर्याने त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी धार दिली, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. राष्ट्राच्या सन्मानासाठी सर्वस्व बलिदान करण्याची त्यांची भावना भारताच्या युवकांच्या साहस आणि दृढ निर्धाराचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे:

“शहीद भगतसिंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन.

आपल्या दुर्दम्य साहस आणि शौर्याने त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी धार दिली.

राष्ट्राच्या सन्मानासाठी सर्वस्व बलिदान करण्याची त्यांची भावना भारताच्या युवकांच्या साहस आणि दृढ निर्धाराचे प्रतीक आहे.”

 

* * *

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai