Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या वैयक्तिक 25 मीटर पिस्टल प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी ईशा सिंगचे केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या वैयक्तिक 25 मीटर पिस्टल प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल ईशा सिंगचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

ईशाने अत्यंत अचूकता आणि संयमासह उत्कृष्ट गुण मिळवले असे नमूद करत  मोदींनी तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.

एक्स  या समाजमाध्यमांवरील संदेशांत पंतप्रधान म्हणाले :

“आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या वैयक्तिक 25 मीटर पिस्टल प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल @singhesha10 चे अभिनंदन. ईशाने कमालीचे अचूक कौशल्य आणि संयम दाखवून उत्कृष्ट गुण संपादन केले. तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी  खूप खूप शुभेच्छा: PM @narendramodi”

 

* * *

निलिमा चितळे/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai