Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत रौप्य आणि कांस्य पदक जिंकल्याबद्दल यशवीर सिंग आणि रोहित यादव यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक जिंकल्याबद्दल यशवीर सिंगचे तर कांस्य पदक मिळवल्याबद्दल रोहित यादवचे अभिनंदन केले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पोडीयमवर आलेल्या  दोन्ही भारतीय भालाफेकपटूंच्या कामगिरीचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

दोन्ही  खेळाडूंसाठी तसेच भारतीय ॲथलेटिक्ससाठी हे उत्कृष्ट यश असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी या क्रीडापटूंना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

“आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पोडीयमवर दोन भारतीय भालाफेकपटू!

वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह रौप्यपदक जिंकल्याबद्दल यशवीर सिंगचे आणि कांस्यपदक पटकावल्याबद्दल रोहित यादवचे अभिनंदन.

दोन्ही खेळाडूंसाठी आणि भारतीय ॲथलेटिक्ससाठी हे उत्कृष्ट यश आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा: PM @narendramodi”

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai