Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियायी क्रीडा स्पर्धेत महिला ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल मनीषा कीर, नीरू आणि आशिमा अहलावत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2026

 

आशियायी क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ‘ट्रॅप टीम’ प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल मनीषा कीर, नीरू आणि आशिमा अहलावत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या या कामगिरीचे वर्णन अचूकता, एकाग्रता आणि उत्कृष्ट संघभावनेचे एक कौतुकास्पद उदाहरण म्हणून केले. त्यांनी संपूर्ण संघाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच त्या भारतासाठी अशीच आणखी यशोशिखरे गाठत राहतील असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान कार्यालयाने ‘X’ वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे:

“आशियायी क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या ट्रॅप टीम प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल मनीषा कीर, नीरू आणि आशिमा अहलावत यांचे हार्दिक अभिनंदन.

ही अचूकता, एकाग्रता आणि संघभावनेची एक अत्यंत कौतुकास्पद कामगिरी होती. संपूर्ण संघाने अशीच उत्कृष्ट कामगिरी करत राहावी आणि भारताचे नाव उज्ज्वल करत राहावे या शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi”

 

* * *

शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai