पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या 4×400 मीटर रिले स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल धर्मवीर चौधरी, मनु टी. एस., जय कुमार आणि विशाल टी. के. यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
या संघाने उत्कृष्ट वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या खेळाडूंच्या या यशामुळे आगामी काळात ॲथलेटिक्स अधिक लोकप्रिय होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सवरील एका संदेशात म्हटले आहे की,
“निश्चितच उल्लेखनीय कामगिरी!
उत्कृष्ट वेळ नोंदवत पुरुषांच्या 4×400 मीटर रिले स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल धर्मवीर चौधरी, मनु टी. एस., जय कुमार आणि विशाल टी. के. यांचे अभिनंदन. त्यांच्या या यशामुळे आगामी काळात ॲथलेटिक्सची लोकप्रियता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. PM @narendramodi”
Remarkable indeed!
Congratulations to Dharmveer Chaudhary, Manu TS, Jay Kumar and Vishal TK on winning Bronze in the Men’s 4×400m Relay with a superb timing. May their success contribute to the popularity of athletics in the times to come: PM @narendramodi pic.twitter.com/TA4inEypGA
— PMO India (@PMOIndia) September 29, 2026
* * *
सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai