Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियायी क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या उंच उडी प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पूजाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2026

 

आशियायी क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या उंच उडी प्रकारात कांस्य पदक पटकावल्याबद्दल पूजाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

दोन दशकांनंतर आशियायी क्रीडा स्पर्धेत या प्रकारात भारताला मिळालेले हे पहिलेच पदक असल्याचे सांगून पंतप्रधानांनी, या कामगिरीचे वर्णन अत्यंत उल्लेखनीय यश असे केले. त्यांनी पूजाला तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी उत्तम शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे:

“भारतीय ॲथलेटिक्ससाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण! आशियायी क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या उंच उडी प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पूजाचे हार्दिक अभिनंदन. दोन दशकांनंतर या प्रकारात भारताने जिंकलेले हे पहिलेच पदक आहे. ही खरोखरच एक संस्मरणीय कामगिरी आहे. तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा: PM @narendramodi”

 

* * *

शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai