पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्या म्हणजेच एक ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) शताब्दी सोहळ्यात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
1926 मध्ये झालेल्या युपीएससी च्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गेल्या वर्षी एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या वर्षभर चालणाऱ्या या उत्सवाचा या कार्यक्रमाद्वारे समारोप होईल. या प्रसंगी पंतप्रधान युपीएससी च्या शताब्दीनिमित्त विशेष स्मारक नाणे, टपाल तिकीट आणि 100 लँडमार्क जजमेंट्स – शेपिंग द पॉलिसीज ऑफ युपीएससी अँड पब्लिक सर्विस कमिशन इन इंडिया(‘100 Landmark Judgements- Shaping the Policies of UPSC and Public Service Commissions in India’) या पुस्तकाचे प्रकाशनही करतील.
या कार्यक्रमात देशभरातून राज्य लोकसेवा आयोगांचे अध्यक्ष आणि सदस्य, भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, UPSC चे अधिकारी आणि इतर अनेक हितसंबंधीय उपस्थित राहणार आहेत.
युपीएससी ने 30 सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यक्रमाचाच हा एक भाग आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी भारत मंडपम इथे ‘शताब्दी समारोह – मंथन’ पार पडेल, ज्यामध्ये विविध विषयांवर नामवंत वक्त्यांची भाषणे आणि चर्चासत्र होईल.
***
राधिका अघोर/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]