Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.

रामनाथ कोविंद यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ कार्यकाळात भारताच्या विकासासाठी, संविधानात अंतर्भूत मूल्यांसाठी आणि जनकल्याणासाठी त्यांची सातत्यपूर्ण बांधिलकी दिसून आली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

रामनाथ कोविंद यांनी समर्पण आणि साधेपणाने देशाची सेवा केली असून, त्यामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोकांकडून त्यांना आदर मिळतो, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वर सांगितले:

“माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

सार्वजनिक जीवनातील त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळात भारताच्या विकासासाठी, आपल्या संविधानात अंतर्भूत मूल्यांसाठी आणि जनकल्याणासाठी त्यांची सातत्यपूर्ण बांधिलकी दिसून आली आहे. त्यांनी समर्पण आणि साधेपणाने देशाची सेवा केली आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोकांकडून त्यांना आदर मिळतो.

त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो.

@ramnathkovind”

***

NitinFulluke / GajendraDeoda / DIneshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai