Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत, सुवर्णपदक कायम राखल्याबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून  अभिनंदन


नवी दिल्ली, 3  ऑक्टोबर 2026

आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात मोठा विजय संपादन करत सुवर्णपदक कायम राखल्याबद्दल  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन  केले आहे.

भारतीय हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत  सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले  आहे, आणि या स्पर्धांमधे आतापर्यंत पाच सुवर्णपदके जिंकली आहेत असे मोदी म्हणाले.  हॉकी संघाच्या या कामगिरीचे त्यांनी ‘असामान्य विजय’ असे वर्णन केले आहे.

पंतप्रधानांनी नमूद केले की, आजचा हा विजय अगदी खास आहे कारण,  पुरुष तसेच महिला अशा दोन्ही संघांनी एकाच आशियाई क्रीडा  स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. आशियाई स्तरावर भारतीय हॉकीने आपली मान अभिमानाने उंचावली आहे असेही ते म्हणाले.

‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले :

“आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 भारतीय हॉकीसाठी खरोखरच विशेष ठरल्या आहेत !

अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक कायम राखल्याबद्दल आपल्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सलग दुसरे सुवर्णपदक आणि आतापर्यंतचे एकूण पाचवे सुवर्णपदक- आपल्या खेळाडूंनी केलेली ही असामान्य कामगिरी आहे.

आजचा हा विजय आणखीनच खास ठरला  कारण पहिल्यांदाच आपल्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही हॉकी संघांनी एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.  आशियाई स्तरावर  भारतीय हॉकीने आपली मान अभिमानाने उंचावली आहे, हे तर निश्चित : पंतप्रधान @narendramodi”

***

सुषमा काणे/सविता म्हसकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]