Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सांस्कृतिक वारसा जपत समृद्ध भारत घडवण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न अधोरेखित करणारा श्री माता अमृतानंदमयी जी यांचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री माता अमृतानंदमयी जी यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

या लेखात, श्री माता अमृतानंदमयी जी यांनी सांस्कृतिक वारसा जपत समृद्ध भारत घडवण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनावर आपले विचार मांडले आहेत. यात सामाजिक सुधारणा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, युवा आणि पर्यावरण यांवर प्रामुख्याने दिला जाणारा भर तसेच शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रातील त्यांच्या प्रयत्नांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ वर पोस्ट केले:

“श्री माता अमृतानंदमयी जी यांनी, भारताचा सांस्कृतिक वारसा जपत असतानाच देशाला समृद्ध बनवण्याच्या पंतप्रधान @narendramodi यांच्या दृष्टिकोनाबाबत विचार मांडले आहेत.

त्यांनी सामाजिक सुधारणा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, युवा आणि पर्यावरण यांवर प्रामुख्याने दिला जाणारा भर तसेच शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रातील त्यांच्या प्रयत्नांचाही उल्लेख केला आहे.

अवश्य वाचा!”

नितीन फुल्लुके /सुषमा काणे /प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai