पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. नानाजी देशमुख हे एक असाधारण राष्ट्रनिर्माते होते, ज्यांनी आपल्या विचारांतून आणि कृतीतून हे दाखवून दिले की खरा बदल हा तळागाळातूनच सुरू होतो, असे स्मरण पंतप्रधानांनी केले.
मोदी म्हणाले की, नानाजी देशमुख यांनी राजकीय निष्ठा आणि विधायक सामाजिक कार्य यांचा सुरेख संगम साधला होता आणि स्वतःला ग्रामीण विकास व लोकसहभागासाठी समर्पित केले होते.
पंतप्रधान म्हणाले की, सशक्त आणि आत्मनिर्भर भारताचे नानाजी देशमुख यांचे स्वप्न साकार करण्यासाठी देश कोणतीही कसर सोडणार नाही.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर लिहिले आहे की,
“नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. एक असाधारण राष्ट्रनिर्माते म्हणून त्यांचे प्रेमपूर्वक स्मरण केले जाते; त्यांनी आपल्या विचारांतून आणि कृतीतून हे दाखवून दिले की खरा बदल तळागाळातूनच सुरू होतो. त्यांच्या जीवनात राजकीय निष्ठा आणि विधायक सामाजिक कार्याचा संगम होता आणि त्यांनी स्वतःला ग्रामीण विकास व लोकसहभागासाठी समर्पित केले होते. सशक्त आणि आत्मनिर्भर भारताचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही.”
Paying homage to Nanaji Deshmukh on his birth anniversary. He is fondly remembered as a remarkable nation-builder who demonstrated in thought and action that true transformation begins at the grassroots. His life combined political conviction with constructive social action, devoting himself to rural development and community participation. We will leave no stone unturned in realising his vision for a strong and self-reliant India.
— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2026
***
नितीन फुल्लुके / राजेश शिरभाते
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]