Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

समृध्दीकडून सक्षमीकरणाकडे प्रशासनाला नेण्याविषयीचा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2026

केंद्रीय मंत्री  ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी लिहिलेला एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे.

भारताच्या प्रशासनाचा दृष्टिकोन समृद्धीकडून सक्षमीकरणाकडे कशाप्रकारे वळत आहे, ज्यामुळे नागरिक विकास प्रक्रियेत सक्रिय सहभागी होऊ शकतील; हे या लेखातून अधोरेखित केले आहे. स्वच्छता, गॅस जोडणी, आरोग्यसेवा आणि कर्जपुरवठ्याची उपलब्धता यांसारखे उपक्रम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यावर आणि लोकांना त्यांचे जीवनमान सुधारण्याची संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतात. 2047 पर्यंत ‘विकसित आणि सशक्त भारत’ घडवण्याच्या संकल्पनेच्या केंद्रस्थानी हा दृष्टिकोन आहे.

आपल्या ‘एक्स’ वर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे;

“भारताच्या प्रशासनाचा दृष्टिकोन समृद्धीकडून सक्षमीकरणाकडे वळत आहे. याद्वारे नागरिकांना विकास प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यास सक्षम केले जात आहे; हे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या लेखात मांडलेले आहे.

स्वच्छता आणि गॅस जोडणीपासून ते आरोग्यसेवा आणि पतपुरवठ्यापर्यंत, सर्व सेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यावर आणि लोकांना त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हा दृष्टिकोन 2047 पर्यंत ‘विकसित आणि सशक्त भारत’ घडवण्याच्या संकल्पनेच्या केंद्रस्थानी आहे.”

नितीन फुल्लुके/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai