Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना दिल्या शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त एनएसजीच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.

धैर्य, अचूकता आणि कर्तव्याप्रतीची अढळ निष्ठा यांचे ते प्रतीक आहेत असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांचा दहशतवादाविरोधातील भक्कम पहारा आणि नागरिकांचे तसेच महत्त्वपूर्ण राष्ट्रीय मालमत्तेचे  संरक्षण करण्याची सज्जता यांचा अत्यंत अभिमान वाटतो आणि आत्मविश्वास वाढतो असे मत त्यांनी नोंदवले.

मोदी यांनी ‘एक्स’ माध्यमावरील संदेशात म्हटले आहे,

“राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा! धैर्य, अचूकता आणि कर्तव्याप्रती अढळ निष्ठा यांचे ते मूर्तीमंत उदाहरण आहेत. त्यांचा दहशतवादाविरोधातील सजग पहारा आणि नागरिकांचे तसेच महत्त्वाच्या राष्ट्रीय ठिकाणांचे संरक्षण करण्याची त्यांची सज्जता अभिमान व आत्मविश्वासाची प्रेरणा देते.”

 

* * *

निलिमा चितळे/सुरेखा जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai