Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2026

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या. तसेच, नागपूर येथे आयोजित शताब्दी वर्षातील श्री विजयादशमी उत्सवात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेले प्रेरणादायी भाषण सामायिक केले.

एक्स या समाज माध्यमावर केलेल्या संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले की,

“आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व स्वयंसेवकांना माझ्या शुभेच्छा. गेल्या अनेक वर्षांपासून संघाचे कार्य पुढे नेणाऱ्या सर्व थोर व्यक्तींना मी अभिवादन करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सेवा, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक एकोपा या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. असंख्य स्वयंसेवकांनी कर्तव्यभावनेतून आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देत समाजासाठी काम केले आहे. यापुढेही ही भावना देशाच्या विकासाला बळ देत राहो, अशी मी सदिच्छा व्यक्त करतो.

नागपूर येथे आयोजित शताब्दी वर्षातील श्री विजयादशमी उत्सवात परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेले भाषण अत्यंत प्रेरणादायी आहे.

या भाषणात त्यांनी देशाची प्रगती, सामाजिक एकोपा, स्वावलंबनाची गरज आणि समाजाचे चारित्र्य अधिक बळकट करण्यासह विविध विषयांवर सविस्तर विचार मांडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या कार्यात सेवाभावना आणि राष्ट्रनिर्माणासाठीची बांधिलकी महत्त्वाची असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. तसेच, त्यांनी पंचपरिवर्तन या संकल्पनेविषयीही सांगताना, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे पंचपरिवर्तन कशा प्रकारे महत्त्वाचे ठरू शकते, याविषयीही ते बोलले.

@RSSorg

@DrMohanBhagwat 

https://www.youtube.com/live/PcWgPtMVw_Q?si=mCFMUSKnpi_UvUhQ”

 

* * *

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai