Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 1500 मीटर टी 12/13 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल राधा व्यंकटेशचे अभिनंदन


नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 1500 मीटर टी 12/13 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल राधा व्यंकटेश यांचे अभिनंदन केले.

राधा यांच्या या यशाबद्दल पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त केला आणि त्यांच्या यशाचा संपूर्ण भारताला आनंद असल्याचे नमूद केले. भविष्यातही त्यांनी अशीच अनेक यश संपादन करावीत, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पुढील संदेश प्रसिद्ध केला:

“राधा व्यंकटेश यांची ही अतिशय शानदार कामगिरी आहे! आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 1500 मीटर टी12/13 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या यशाचा संपूर्ण भारताला आनंद आहे. भविष्यातही त्यांनी अशीच अनेक यश संपादन करावीत, अशा माझ्या त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा : PM @narendramodi”

 

* * *

नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai