नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2026
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर टी-20 प्रकारात पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकल्याबद्दल दीप्ती जीवनजीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.
आपल्या कामगिरीत सुधारणा करत स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करून विजेतेपद कायम राखणे ही खरोखरच उल्लेखनीय कामगिरी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. दीप्तीने आपल्या कामगिरीतून खऱ्या विजेत्याचे गुण प्रदर्शित केले असून तिचे यश असंख्य युवा खेळाडूंना प्रेरणा देईल, असेही त्यांनी म्हटले. पंतप्रधानांनी दीप्तीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“उत्कृष्टतेचे नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या विजेत्या!
दीप्ती जीवनजीने आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर टी-20 प्रकारात पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले आहे. स्पर्धेतील नवा विक्रम प्रस्थापित करत तिने आपले विजेतेपद कायम राखले आहे. कामगिरीत सुधारणा करत विजेतेपद टिकवून ठेवणे ही खरोखरच उल्लेखनीय कामगिरी आहे.
दीप्तीने आपल्या कामगिरीतून खऱ्या विजेत्याचे गुण प्रदर्शित केले आहेत. तिचे यश असंख्य युवा खेळाडूंना प्रेरणा देईल. दिप्तीला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा : PM @narendramodi”
A champion who keeps redefining excellence!
Deepthi Jeevanji has once again won Gold in the Women’s 400m T20 at the Asian Para Games, defending her title with a phenomenal Games Record. To retain a title while improving one’s performance is a remarkable accomplishment indeed.
She has demonstrated the true spirit of a champion. Her success will inspire countless young athletes. My best wishes: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2026
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
A champion who keeps redefining excellence! Deepthi Jeevanji has once again won Gold in the Women's 400m T20 at the Asian Para Games, defending her title with a phenomenal Games Record. To retain a title while improving one's performance is a remarkable accomplishment indeed. She has demonstrated the true spirit of a champion. Her success will inspire countless young athletes. My best wishes: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2026