Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल सृष्टी अरोराचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले


आशियाई पॅरा गेम्समधील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एसएच 1 प्रकारात कांस्यपदक मिळवल्याबद्दल सृष्टी अरोराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

तिच्या पहिल्याच आशियाई पॅरा गेम्समधील ही एक उत्तम सुरुवात असल्याचे नमूद करत, मोदींनी ती देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी पुढेही करत राहील असा विश्वास व्यक्त केला आणि तिला शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे:

आपल्या पहिल्याच आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी झालेल्या सृष्टी अरोराने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1 प्रकारात कांस्यपदक मिळवले आहे. हे पदक एक उत्तम सुरुवात आहे आणि मला खात्री आहे की सृष्टी देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी पुढेही करत राहील. अभिनंदन आणि शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi”

***

NehaKulkarni / RajeshShirbhate / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai