Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त शूर पोलीस जवानांना वाहिली श्रद्धांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘पोलीस स्मृती दिना’निमित्त सर्व पोलीस जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी रोखणे, आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने प्रतिसाद देणे आणि अत्यंत आव्हानात्मक प्रसंगांमध्ये नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात पोलीस दलाचे योगदान अमूल्य आहे, असे त्यांनी नमूद केले.

कर्तव्य बजावताना प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूर पोलीस जवानांना आदरांजली अर्पण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांचे शौर्य, अतूट समर्पण  आणि सर्वोच्च बलिदान देशाच्या स्मरणात सदैव कोरलेले राहील.

‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले:

“पोलीस स्मृती दिन हा आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. हे कर्मचारी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही कमालीच्या निष्ठेने आपली सेवा बजावतात. कायदा व सुव्यवस्था राखण्यापासून ते गुन्हेगारी रोखण्यात, आणीबाणीच्या प्रसंगी तत्परतेने प्रतिसाद देण्यात आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात  त्यांचे योगदान अमूल्य आहे.

कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूर पोलीस कर्मचाऱ्यांना आम्ही आदरांजली अर्पण करतो. त्यांचे शौर्य , अतूट समर्पण आणि सर्वोच्च बलिदान आपल्या राष्ट्राच्या स्मरणात सदैव कोरलेले राहील.”

***

NehaKulkarni / SushamaKane / DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai