Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदासचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2026 

 

आशियाई पॅरा क्रिडा स्पर्धा 2026 मध्ये महिला एकेरी एसयू5 पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनीषा रामदासचे अभिनंदन केले आहे.

सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक मिळवणे हे मनिषाचे खेळाप्रती सातत्य आणि वचनबद्धता दर्शवते, असे पंतप्रधान म्हणाले. मनिषाचे प्रयत्न आणि स्पर्धात्मक वृत्ती खरोखरच कौतुकास्पद आहेत. भविष्यातही ती असेच मोठे यश मिळवत राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 X या समाज माध्यमावरील संदेशात, पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:

“मनीषा रामदासला आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत आणखी एक पदक!

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिला एकेरी SU5 पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीषाचे अभिनंदन! सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक मिळवणे यातून खेळाप्रती तिचे सातत्य आणि वचनबद्धता दिसून येते. तिचे प्रयत्न आणि स्पर्धात्मक वृत्ती खरोखरच कौतुकास्पद आहे. भविष्यातही तिला असेच मोठे यश मिळो: PM @narendramodi”

 

* * *

राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai