Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल रवि कार्तिक बुडिगिनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2026 

 

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर फ्रीस्टाइल एस-13 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवि कार्तिक बुडिगिनाचे अभिनंदन केले आहे.

रवि कार्तिकच्या या कामगिरीचा आपल्याला अत्यंत अभिमान असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्याची जिद्द आणि खेळांप्रती समर्पण उल्लेखनीय असल्याचे सांगत पंतप्रधानांनी त्याला भविष्यातील स्पर्धांसाठीही शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे,

“पुरुषांच्या 50 मीटर फ्रीस्टाइल एस-13 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल रवि कार्तिक बुडिगिनाचा आपल्याला अत्यंत अभिमान वाटतो. त्याची जिद्द आणि खेळाप्रताई समर्पण उल्लेखनीय आहे. आगामी स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छा!” PM @narendramodi”

 

* * *

राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai