नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 5 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 4:30 च्या सुमाराला नवी दिल्लीत इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय चमूशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
जपानमधील आईची नागोया इथे या वर्षी पार पडलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारताने आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. भारताच्या एकूण 97 पॅरा खेळाडूंनी 30 सुवर्ण, 35 रौप्य आणि 49 कांस्य पदकांसह एकूण 114 पदकांची कमाई केली.
या कार्यक्रमाला खेळाडू, प्रशिक्षक, भारतीय पॅरालिम्पिक समिती आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकारी, राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे प्रतिनिधी तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत.
* * *
राधिका अघोर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai