नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2026
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेष पोक्सो (POCSO) न्यायालयांसह जलदगती विशेष न्यायालयांची (FTSCs) केंद्र पुरस्कृत योजना पुढील पाच वर्षे सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. ही योजना 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या कालावधीत सुरू राहणार आहे. या योजनेसाठी एकूण 3,788.04 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 2,353.15 कोटी रुपये केंद्र सरकारचा, तर 1,434.89 कोटी रुपये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा वाटा असेल. केंद्र सरकारच्या वाट्याचा निधी ‘निर्भया निधी’मधून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
मंजूर योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
प्रमुख परिणाम:
ही योजना सुरू ठेवल्याने खालील प्रमुख परिणाम अपेक्षित आहेत:
अंमलबजावणीचे धोरण आणि उद्दिष्टे:
या योजनेची अंमलबजावणी न्याय विभागाद्वारे आणि संबंधित राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांच्या समन्वयाने केली जाईल. अंमलबजावणीचे मुख्य धोरण आणि उद्दिष्टे खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत:
850 जलद गती विशेष न्यायालयांपर्यंत या योजनेची व्याप्ती विस्तारावी असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्ह्यांनाही सामावून घेता यावे यासाठी हा विस्तार केला जात आहे. बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत प्रलंबित खटल्यांच्या आधारे असे जिल्हे निश्चित केले जाणार आहेत.
पार्श्वभूमी:
ही योजना 02.10.2019 पासून कार्यान्वित आहे. बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी समर्पित फास्ट ट्रॅक विशेष न्यायालये सुरू राहतील याची खात्री करण्यासाठी या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:
|
सुरुवात झाल्याची तारीख |
02.10.2019 |
|
सहभागी राज्ये/केंद्रशासित प्रदेश |
29 |
|
एकूण कार्यरत फास्ट ट्रॅक विशेष न्यायालये (केवळ पोक्सो प्रकरणांसाठी असलेल्या न्यायालयांसह) |
779 (ज्यामध्ये 399 केवळ पोक्सो प्रकरणांसाठीची न्यायालये समाविष्ट आहेत) |
|
योजनेच्या सुरुवातीपासून निकाली काढलेली एकूण प्रकरणे |
4,02,457 |
|
विस्तारित योजनेअंतर्गत प्रस्तावित फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयांची संख्या |
850 |
|
मंजूर कालावधी |
31.03.2031 पर्यंत |
तपशील |
|---|
ही योजना बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी समर्पित न्यायालये उपलब्ध करून देऊन, लैंगिक गुन्ह्यांविरुद्धच्या न्यायालयीन कार्यवाहीला बळकट करण्यास मदत करत आहे. न्याय विभाग एफटीएससी डॅशबोर्ड’द्वारे, उच्च न्यायालयांकडून वेळोवेळी माहिती गोळा करून आणि संबंधित भागधारकांसोबत आढावा बैठका घेऊन या न्यायालयांच्या कामकाजावर नियमित देखरेख ठेवतो. या योजनेला आणखी पाच वर्षांची मुदतवाढ मिळाल्यामुळे न्यायव्यवस्थेची संस्थात्मक क्षमता अधिक बळकट होईल, लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होईल आणि पीडितांना—विशेषतः महिला आणि मुलांना—वेळेवर न्याय मिळणे सुनिश्चित होईल.
फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयांसाठीची ही केंद्र पुरस्कृत योजना, फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम, 2018 च्या अंमलबजावणीसाठी आणि सू मोटो म्हणजेच स्वतःहून दखल घेत केलेल्या रिट फौजदारी याचिका क्र. 1/2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 25.07.2019 रोजी दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यासाठी 02.10.2019 रोजी सुरू करण्यात आली होती. ज्या जिल्ह्यांमध्ये पोक्सो कायदा, 2012 अंतर्गत 100 पेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत, तिथे स्वतंत्र विशेष न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
त्यानुसार, केंद्र सरकारने समर्पित फास्ट ट्रॅक विशेष न्यायालये स्थापन करण्याची योजना सुरू केली, ज्यामध्ये केवळ पोक्सो प्रकरणांसाठीच्या न्यायालयांचाही समावेश आहे. बलात्कार आणि पोक्सो कायदा, 2012 अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित प्रकरणांचा ठराविक कालमर्यादेत निपटारा करण्यावर भर देण्यात आला होता.
ही योजना सुरुवातीला एका वर्षाच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती आणि त्यानंतर ती 31.03.2026 पर्यंत वाढवण्यात आली होती. सध्याच्या मंजुरीमुळे ही योजना आणखी पाच वर्षांच्या कालावधीसाठी, म्हणजेच 31.03.2031 पर्यंत सुरू राहणार आहे.
* * *
राधिका अघोर/आशुतोष सावे/तुषार पवार/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai