Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतरत्न एल. के. अडवाणी यांनी 100 व्या वर्षांत पदार्पण केल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका लेखामधून आपले विचार मांडताना अडवाणी यांनी भारतासाठी दिलेले योगदान अधोरेखित केले आहे. अडवाणी यांच्या जीवनप्रवासाचे स्मरण करताना फाळणीच्या भीषण अनुभवातून सावरणे आणि शून्यातून सुरुवात करत आयुष्य उभारण्यापर्यंत, जनसंघाला बळकटी देणे, भाजपची उभारणी करणे, आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभे राहणे, सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेचे नेतृत्व करणे आणि केंद्र सरकारमध्ये सामील होत राष्ट्राची सेवा करणे या विविध टप्प्यांचा उल्लेख केला आहे.

मोदी यांनी अडवाणी यांच्या इतर पैलूंवर प्रकाश टाकताना, त्यांच्या अफाट वाचनाची आवड, संस्कृती आणि चित्रपटांविषयीचे त्यांचे प्रेम तसंच लेखक म्हणून दिलेले योगदान यांचा उल्लेख केला आहे.

एक्स या समाजमाध्यमांवरील संदेशात, मोदी म्हणतात;
आज 8 नोव्हेंबर, एक अत्यंत महत्त्वाचा दिवस. आदरणीय एल. के अडवाणी यांनी शंभराव्या वर्षांत पदार्पण केले. या विशेष प्रसंगी मी त्यांना शुभेच्छा देतो.

देशासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानावर अधोरेखित करणारा लेख मी लिहिला आहे.

त्यांच्या जीवन प्रवासाच्या विविध टप्प्यांचे स्मरण करताना, फाळणीतले भीषण अनुभव असोत की शून्यातून आयुष्य घडवणे असो की जनसंघाला बळकट करणे, भाजपची बांधणी करणे, आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या संरक्षणासाठी खंबीर उभे राहणे, सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेचे नेतृत्व करणे असो किंवा सरकारमध्ये राहून राष्ट्राची सेवा करणे असो हे सर्व नमूद केले आहे.

अडवाणी यांच्या इतर पैलूंचाही आढावा घेतला आहे – जसे त्यांचे अफाट वाचन, त्यांचे संस्कृती आणि चित्रपटांविषयीचे प्रेम, विपुल लेखन करणारा लेखक आणि इतर अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे.

English – https://www.narendramodi.in/bharat-ratna-lk-advani-ji-at-100

हिंदी – https://www.narendramodi.in/hi/bharat-ratna-lk-advani-ji-at-100 ” 

***

अंबादास यादव/विजयालक्ष्मी साळवी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]