Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रगतीशील राष्ट्राचे सामर्थ्य आणि शक्तीचा पाया अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक


प्रगतीशील राष्ट्राचे सामर्थ्य आणि शक्ती ही तप, धार्मिक आचरण आणि सर्वांच्या कल्याणाच्या इच्छाशक्तीच्या पायावर आधारलेली असते, असे अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले.

यासंदर्भात पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर सामायिक केलेला संदेश :

भद्रमिच्छन्त ऋषयः स्वर्विदस्तपो दीक्षामुपनिषेदुरग्रे।

ततो राष्ट्रं बलमोजश्च जातं तदस्मै देवा उपसन्नमन्तु॥

सर्वांच्या कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या आणि परम ज्ञानी असलेल्या ऋषींनी सर्वप्रथम स्वतःला तप आणि धार्मिक आचरणाला समर्पित केले. या तपातून आणि आचरणातूनच राष्ट्र, त्या राष्ट्राची शक्ती आणि ओज सामर्थ्य निर्माण झाले. सर्व देव अशा प्रगतीशील राष्ट्राला आणि त्याच्या सामर्थ्याला नमन करतात.

***

Nitin Fulluke / Tushar Pawar / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai