Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रब्बी 2026-27 साठी फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त खतांवरील अनुदान दरांना मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त (P&K) खतांवर रब्बी हंगाम 2026-27 (01.10.2029 ते 31.03.2027) साठी ‘न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी’ (NBS) दरांना मंजुरी दिली आहे. रब्बी 2026-27 साठी अंदाजे 62,370.02 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची आवश्यकता असेल. हे प्रमाण रब्बी 2025-26 हंगामाच्या तुलनेत सुमारे 24,417.73 कोटी रुपयांनी अधिक आहे. रब्बी 2025-26 साठीचे बजेट 37,952.29 कोटी रुपये इतके होते.

फायदे:

* शेतकऱ्यांना सवलतीच्या, परवडणाऱ्या आणि रास्त दरांत खतांची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल.

* खते व कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलीकडील बदल लक्षात घेऊन P&K खतांवरील अनुदानाचे सुसूत्रीकरण.

अंमलबजावणीची रणनीती आणि उद्दिष्टे:

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरांत खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी, डीएपी (DAP) आणि एनपीकेएस (NPKS) यासह सर्व प्रकारच्या पी अँड के (P&K) खतांवर रब्बी हंगाम 2026-27 च्या मंजूर दरांनुसार (01.10.2026 ते 31.03.2027 पर्यंत लागू) अनुदान दिले जाईल.

पार्श्वभूमी:

सरकार खत उत्पादक आणि आयातदारांच्या माध्यमातून डीएपीसह पी अँड के खतांचे 28 प्रकार सवलतीच्या दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. पी अँड के खतांवरील हे अनुदान 01.04.2010 पासून ‘न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी’ (NBS) योजनेद्वारे नियंत्रित केले जाते. आपल्या शेतकरी केंद्रित धोरणाला अनुसरून, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरांत पी अँड के खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

युरिया, डीएपी, एमओपी (MOP) आणि गंधक (सल्फर) यांसारख्या खतांच्या व कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलीकडील बदल विचारात घेऊन, सरकारने डीएपी आणि एनपीकेएससह फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त (P&K) खतांवर 01.10.2026 ते 31.03.2027 या रब्बी 2026-27 हंगामासाठी एनबीएस (NBS) दरांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. खत कंपन्यांना मंजूर आणि अधिसूचित दरांनुसार हे अनुदान प्रदान केले जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य व परवडणाऱ्या किमतीत खते मिळतील.

***

Shailesh Patil / Vaibhav Joshi / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai