Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लोकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या महनीय व्यक्तींच्या निःस्वार्थ साधनेवर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक


नवी दिल्‍ली, 12 नोव्‍हेंबर 2026

 

महनीय माणसे ही स्वतःच्या प्रकाशाने चमकणाऱ्या दिव्य रत्नांप्रमाणे, कोणत्याही अपेक्षेशिवाय निस्वार्थपणे वागून, नेहमी लोकांच्या कल्याणासाठी झटत असतात; हे अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले आहे.

आपल्या ‘एक्स’ हॅन्डलवर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे;

“अपेक्षन्ते न च स्नेहं न पात्रं न दशान्तरम्।

सदा लोकहिते युक्ता रत्नदीपा इवोत्तमाः।।”

महनीय माणसे नेहमी इतरांच्या कल्याणासाठी समर्पित असतात. आपल्या निःस्वार्थ कार्यात, ते प्रेमाची अपेक्षा करत नाहीत, तसेच समोरच्या व्यक्तीच्या योग्यतेची किंवा तत्कालीन परिस्थितीची पर्वा करत नाहीत. ते स्वतःच्या प्रकाशाने चमकणाऱ्या दिव्य रत्नांसारखे असतात.

 

* * *

नितीन फुल्‍लुके/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai