Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

छठ महापर्वाच्या संध्या अर्घ्यनिमित्त पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छठ महापर्वाच्या संध्या अर्घ्यनिमित्त देशभरातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

निसर्ग पूजेला समर्पित असलेला हा पवित्र सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन चेतना आणि उत्साह घेऊन येवो, तसेच समाजात सलोखा आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ करो, अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली. सूर्यदेवाच्या कृपेने सर्वांचे जीवन प्रकाशमान व्हावे अशी प्रार्थना करत त्यांनी छठी मैयाचा जयजयकार केला.

पंतप्रधानांनी एक्स  या समाज माध्यमावर आपल्या संदेशात म्हटले आहे की:

“सर्व देशवासियांना महापर्व छठच्या संध्या अर्घ्यनिमित्त अनेक अनेक शुभेच्छा. निसर्ग-पूजेला समर्पित हे पवित्र पर्व  प्रत्येकासाठी नवी चेतना आणि स्फूर्ती घेऊन येवो, तसेच समाजात सद्भाव आणि समरसता अधिक दृढ करो. सूर्यदेवाच्या कृपेने सर्वांचे जीवन प्रकाशमान  होवो. जय छठी मैया!”

***

सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]