Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून अभिवादन, जनजातीय गौरव दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा.


धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांचे धैर्य, संघर्ष आणि बलिदान यांचे स्मरण करताना पंतप्रधान म्हणाले की, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी त्यांचे कार्य प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आदिवासी बांधवांचा सन्मान, त्यांना विकासाच्या अधिक संधी आणि समृद्धी मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशाच्या उभारणीत आदिवासी समाजाने दिलेल्या अमूल्य योगदानाचा सर्वांनी गौरव करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले,

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मी समस्त देशवासीयांच्या वतीने त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो.

या पवित्र दिवसाशी जोडलेल्या जनजातीय गौरव दिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

धरती आबांचे अतुलनीय धैर्य, संघर्ष आणि बलिदान देशातील प्रत्येक पिढीला स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि हक्कांच्या रक्षणासाठी प्रेरणा देत राहील.

त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आदिवासी बांधवांचा सन्मान, त्यांना विकासाच्या संधी आणि समृद्धी मिळवून देण्यासाठी आमचे सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे.

चला, राष्ट्र उभारणीत आदिवासी समाजाने दिलेल्या अमूल्य योगदानाला आपण सर्वजण अभिवादन करूया.

***

सुषमा काणे/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]