Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फलनिष्पत्तीची सूची: पंतप्रधानांचा फिलिपाईन्समधील मनिला दौरा


दस्तावेज:
1. आपत्ती व्यवस्थापनातील सहकार्यासंदर्भात आसियान-भारत संयुक्त निवेदन
2. ऑनलाईन घोटाळे आणि संबंधित गुन्ह्यांच्या विरोधात सहकार्य बळकट करण्यासंदर्भात पूर्व आशिया शिखर परिषद नेत्यांचे निवेदन
3. आपल्या भविष्याची एकत्रितपणे दिशा निश्चिती: स्थैर्य आणि नूतनीकरण यावर आधारित पूर्व आशिया शिखर परिषद जाहीरनामा

 

घोषणा

1. 23 वी भारत-आसियान शिखर परिषद

1. संपर्क जोडणी, वैज्ञानिक संशोधन, आपत्ती व्यवस्थापन, तटरक्षक दलांमधील सहकार्य, सागरी क्षेत्रासंदर्भातील जागरुकता आणि नाविकांची सुरक्षितता वृद्धिंगत करणे यांसारख्या विषयांवर दीर्घकालीन आसियान-भारत सागरी सहकार्य योजना;

2. या प्रदेशात क्षमता निर्मितीसाठी संयुक्त सायबर न्यायवैद्यक प्रशिक्षण कार्यक्रम;

3. आसियान-भारत अणुउर्जासंबंधी तांत्रिक देवाणघेवाण;

4. आसियान-भारत अंतराळ क्षेत्रसंबंधी हॅकेथॉन;

5. खनन तसेच महत्त्वाच्या खनिजांच्या संदर्भात आसियान-भारत सहकार्य;

6. युवक शिखर परिषद, युवा संसद सदस्य आदानप्रदान आणि स्टार्ट-अप हॅकेथॉन्स यांच्या माध्यमातून आसियान-भारत युवा संपर्क;

7. नालंदा विद्यापीठात आसियान देशांतील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्त्यांमध्ये वाढ;

8. वेव्हज 2027 मध्ये आसियान-भारत सर्जनशील भागीदारीविषयक दालन; आणि

9. आसियान देशांतून येणाऱ्या पर्यटकांसाठी मोफत ई-व्हिसा.

2. 21वी पूर्व आशियाई शिखर परिषद (ईएएस)

1. संयुक्त प्रशिक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद यामधील सहकार्यासाठी नाविकांच्या सुरक्षेसंदर्भातील उपक्रम.

2. ऑनलाईन घोटाळे तसेच सायबर गुन्ह्यांसारख्या सीमापार गुन्ह्यांमुळे निर्माण होणाऱ्या अत्याधुनिक धोक्यांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ येथे ईएएस सायबर गुन्हे परिषद.

3. लोथल येथे ईएएस सागरी वारसा महोत्सव.

ईएएस देशांसोबत अधिक शैक्षणिक सहकार्याची जोपासना करण्यासाठी नालंदा येथे ईएएस विद्यापीठ परिषद.

 

***
 

Nilima Chitale / Sanjana Chitnis / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai