Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि रवांडा यांच्यातल्या हवाई सेवा करारावर स्वाक्षऱ्या करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


भारत आणि रवांडा यांच्यातल्या हवाई सेवा करारावर स्वाक्षऱ्या करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

भारत आणि रवांडामधे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना देण्याची क्षमता या करारात आहे. दोन्ही देशांना सुरक्षित व्यापार संधी पुरवण्यासाठी तसेच दळणवळण वृद्धिंगत होण्यासाठी हा करार पोषक ठरणार आहे.

A.Sharma/S.Tupe/N.Chitale/Anagha