Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि बांगलादेश यांच्यातील जनसंज्ञापन क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


भारत आणि बांगलादेश यांच्यात जनसंज्ञापन क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या करारानुसार दोन्ही देशांच्या जनसंज्ञापन व जनसंपर्क क्षेत्रात असलेल्या कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण/ अभ्यास दौरे उपलब्ध केले जातील. त्यामुळे जनसंज्ञापन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या देवाणघेवाणीला चालना मिळेल. तसेच या क्षेत्रातील शैक्षणिक, प्रशिक्षण व संशोधन संस्थांच्या उभारणीला प्रोत्साहन मिळेल.

N.Sapre/S.Patil/Anagha