पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे “राष्ट्रीय महत्वाची संस्था” म्हणून भारतीय पेट्रोलियम आणि ऊर्जा संस्था स्थापन करायला मंजुरी दिली. आयआयटी प्रमाणे पदवी प्रदान करण्याचा कायदेशीर अधिकार आणि प्रशासन व्यवस्था या संस्थेकडे असेल. पेट्रोलियम आणि ऊर्जा अध्ययनात “सर्वोत्कृष्ट केंद्र ” बनण्यासाठी आवश्यक दर्जा, एक स्वतंत्र कायदा या संस्थेला देईल.
ही संस्था उभारण्यासाठी 655.46 कोटी रुपये भांडवल खर्च म्हणून आणि एंडोमेंट निधीसाठी 200 कोटी रुपये योगदान द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
APS/S.Tupe/S.Kane/Anagha