Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि बांगलादेश येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय यांच्या विभागीय आदानप्रदान कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि बांगलादेश येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय यांच्या विभागीय आदानप्रदान कराराला कार्योत्तर मंजुरी दिली.

राष्ट्रीय सुरक्षा, विकास आणि धोरणात्मक अभ्यास या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही महाविद्यालयांदरम्यान नियमित आदानप्रदान कार्यक्रम तसेच शाश्वत यंत्रणा स्थापन करणे हा या कराराचा उद्देश आहे.

दोन्ही देशांमधील भौगोलिक आणि सांस्कृतिक संबंध लक्षात घेता, दहशतवादासारख्या अनेक समान आव्हानाचा सामना करण्यासाठी संयुक्त कृती आवश्यक आहे. त्यामुळे सशस्त्र दलांमध्ये उत्तम समन्वय आणि सहकार्य गरजेचे आहे. या आदानप्रदान कार्यक्रमामुळे सशस्त्र दलांच्या क्षमतेत वाढ होऊन समान आव्हानांचा उत्तम प्रकारे सामना करता येईल. लष्करी शिक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी हा करार यंत्रणा तयार करेल.

N.Sapre/S.Kane/P.Kor