Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सोवर्जीन सुवर्ण रोखे योजनेच्या मार्गदर्शक सूचनांच्या फेरआढाव्याला मंत्रिमंडळाची मंजूरी


सोवर्जीन सुवर्ण रोखे योजनेची नियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी,या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांच्या फेरआढाव्याला मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. या योजनेत दोन बदल करण्यात आले आहेत.

योजना अधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीने आणि सोने आयातीमुळे अर्थव्यवस्थेवर येणारा ताण त्याचबरोबर चालू खात्यातली तूट कमी करण्यासाठी यात विशिष्ट बदल करण्यात आले आहेत.वेगवेगळ्या सुवर्ण रोख्यांसाठी वेगवेगळे दर निश्चित करून आकारण्यासाठी वित्त मंत्रालयाला लवचिकता देण्यात आली आहे.

या योजनेतल्या या बदलांना मंजुरी देण्यात आली आहे.

आर्थिक वर्षासाठी गुंतवणुकीची मर्यादा वाढवून प्रति व्यक्ती ती 4 किलो करण्यात आली आहे तसेच अविभक्त हिंदू कुटुंबासाठीही ती चार किलो करण्यात आली आहे. आणि न्यास आणि वेळोवेळी सरकारकडून सूचित करण्यात आलेल्या संस्थांसाठी 20 किलोग्रॅम करण्यात आली आहे.

मर्यादेचे मापन, वित्तीय वर्षाच्या आधारे केले जाईल. मागणीच्या आधारावर सुवर्ण रोखे उपलब्ध होतील.या रोख्याची तरलता आणि बाजारसंबंधी क्षमता सुधारण्यासाठी योग्य अशा बाजाराभिमुख उपाययोजना करण्यात येतील.आवश्यकता भासल्यास सरकार, एजंटांना उच्च कमिशन देण्यासाठी परवानगी देऊ शकते.

N.Sapre/N.Chitale/Anagha