Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचे कार्यक्रम

2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचे कार्यक्रम

2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचे कार्यक्रम

2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचे कार्यक्रम

2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचे कार्यक्रम

2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचे कार्यक्रम

2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचे कार्यक्रम

2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचे कार्यक्रम

2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचे कार्यक्रम

2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचे कार्यक्रम

2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचे कार्यक्रम


पंतप्रधानांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान ट्विटरवर म्हणाले, “पूज्य बापूंना शतश: प्रणाम ! लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीदिनी माझा प्रणाम !”

पंतप्रधान झारखंडमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमध्ये खुंटी येथील जिल्हा न्यायालय परिसरात छतावरील 180 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. यावेळी मोठया संख्येने उपस्थित असलेल्या आदिवासी महिलांच्या विशाल सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, गांधी जयंतीच्या दिनी सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करणे अधिक सयुक्तिक आहे. ते म्हणाले की, महात्मा गांधींनी आपल्या विचारांद्वारे आणि कर्माद्वारे नेहमी निसर्गाशी समतोल साधत जगण्याचा मार्ग दाखवला.

पंतप्रधानांनी नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या दौऱ्याबाबत सांगितले की तिथे उपस्थित असलेल्या जगभरातील नेत्यांनी जागतिक तापमान वाढ आणि त्यामुळे मानवजातीला संभाव्य धोका याबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की यासाठी भारत जबाबदार नाही, कारण आपल्या पूर्वजांनी कधीही आपल्याला निसर्गाला हानी पोचवण्याचे संस्कार दिले नाहीत. मात्र पंतप्रधानांनी स्पष्ट केले की या संकटापासून मानवतेला वाचवण्यासाठी भारत संपूर्ण सहकार्य करेल ते म्हणाले की, सौर ऊर्जेचा वापर हे याच दिशेने एक पाऊल आहे. कोळशाचा मुबलक साठा असलेल्या झारखंडमधील एक जिल्हा न्यायालय सौर ऊर्जेवर चालणे ही एक मोठी गोष्ट आहे.

पंतप्रधान म्हणाले की, न्यायालयांमध्ये वीज उपलब्ध नसल्यामुळे न्यायदान प्रक्रियेत बाधा येणे अशी अनेक उदाहरणे आहेत. न्यायालय परिसरात सौर ऊर्जा उपलब्ध झाल्यास अशा प्रकारची परिस्थिती ओढवणार नाही. पंतप्रधानांनी लोकांना एलईडी दिव्यांचा वापर करुन वीज बिलात बचत करण्याचे आवाहन यावेळी केले.

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान म्हणाले की देशाने नुकतीच 1965 च्या भारत-पाक युध्दातील भारताच्या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. हे युध्द जिंकले तेव्हा लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते. पंतप्रधानांनी अलिकडच्या ताश्कंद दोऱ्याचा उल्लेख केला, जिथे त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे उद्‌घाटन केले.

पंतप्रधानांनी दुमका येथे प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महाऋण शिबिराचे उद्‌घाटन केले, आणि पाच लाभार्थ्यांना मुद्रा कार्ड आणि कर्जासंबंधी कागदपत्रं सुपूर्द केली. त्यांनी खुंटी आणि दुमका, या दोन्ही ठिकाणी मोठया संख्येने लोक उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हणाले की यातून दिसून येते की झारखंडचे लोक विकासासाठी किती आतुर आहेत. जागतिक बँकेच्या अलिकडच्या अहवालात, नमूद करण्यात आलेल्या “सुगम व्यापारासाठी अनुकूल झारखंड” या प्रशंसेसाठी राज्य सरकार आणि जनतेचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत, 42 लाख लोकांना कर्ज देण्याची घोषणा केली, ज्याद्वारे 26 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ते म्हणाले की, यामुळे लघु उद्योजकांना आपला उद्योग वाढवण्यिासाठी तसेच सावरकरांच्या तावडीतून मुक्त होण्यास मदत होईल. ते म्हणाले की या लाभार्थ्यांमध्ये 20 लाख महिला आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, “स्वत:हून अनुदान सोडून देण्याच्या” अभियानाअंतर्गत, 39 लाख लोकांनी स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान सोडले. तीन दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना गॅस जोडणी देताना पंतप्रधानांनी त्या सर्वांचे आभार मानले, ज्यांनी अनुदान सोडले आणि त्यामुळे गरजवंतांना त्याचा लाभ मिळत आहे.

पंतप्रधानांनी दुमका जिल्हयातील ऐतिहासिक मलुती मंदिर संकुलाच्या संरक्षण आणि विकास प्रकल्पाचे ऑनलाईन उद्‌घाटन केले.

सफाईगिरी परिषद आणि पुरस्कार 2015

स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महात्मा गांधी यांच्यापेक्षा मोठी प्रेरणा दुसरी कोणती असू शकत नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. इंडिया टूडे समूहाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या “सफाईगिरी परिषद आणि पुरस्कार 2015” मध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की गेल्या वर्षभरात हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. पंतप्रधानांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी यासंदर्भात पार पडलेल्या सकारात्मक आणि सक्रीय भूमिकेचा विशेष उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की स्वच्छता ही सवय आहे. एकदा ही सवय लागली की कोणतीही व्यक्ती अस्वच्छ वातावरण सहन करु शकत नाही. ते म्हणाले की भारत वैयक्तिक स्वच्छतेबाबत सतर्क आहे, मात्र सामाजिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. यात सुधारणा होणे आवश्यक आहे.

पंतप्रधान म्हणाले की भारतात अस्वच्छ परिसरामुळे दररोज एक हजारांहून अधिक मुलांचा मृत्यू होतो. स्वच्छ भारताकडे केवळ एक सरकारी कार्यक्रम म्हणून पाहिले जाऊ नये असे ते म्हणाले. जर 125 कोटी भारतीयांनी ठरवलं की भारत स्वच्छ व्हायला हवा, तर ते नक्की होईल असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले की त्यांच्या कामामुळे इतरांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांनी युवकांचे उदाहरण दिले, ज्यांनी गेल्या वर्षभरात स्वच्छ भारत अभियान महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

S. Kane/N.Sapre