Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उच्च शैक्षणिक संस्थांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यासाठी राष्ट्रीय परीक्षण संस्थेच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शैक्षणिक संस्थांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यासाठी , भारतीय सोसायटी नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत नोंदणीकृत सोसायटी म्हणून तसेच स्वायत्त आणि स्वतंत्र प्रमुख परीक्षण संस्था म्हणून राष्ट्रीय परीक्षण संस्थेची स्थापना (एनटीए) करायला मंजुरी दिली आहे.

वैशिष्ट्ये:

  • एनटीए सुरूवातीला सध्या सीबीएसईद्वारा घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा घेईल.
  • एनटीए पूर्णपणे सज्ज झाल्यानंतर हळूहळू अन्य परीक्षा घेईल.
  • प्रवेश परीक्षा वर्षातून किमान दोन वेळा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल, ज्यामुळे उमेदवारांना उत्कृष्ट कामगिरी करण्याची पुरेशी संधी मिळेल.
  • ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, उपजिल्हा / जिल्हा स्तरावर केंद्रे उभारली जातील आणि शक्यतो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल.

रचना :

  • एनटीएच्या अध्यक्षपदी एमएचआरडीद्वारा नियुक्त केलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ञ असतील.

  महासंचालक मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आणि सरकारद्वारा त्यांची नियुक्ती केली जाईल.

  प्रशासकीय मंडळात वापरकर्ता संस्थांचे सदस्य असतील.

  • महासंचालकांना सहाय्यक म्हणून शिक्षणतज्ज्ञ यांच्या नेतृत्वाखालील 9 जणांचा समावेश असेल.

आर्थिक साहाय्य :

एनटीएला पहिल्या वर्षी आपले कार्य सुरू करण्यासाठी भारत सरकारकडून 25 कोटी रुपये एक-वेळ अनुदान दिले जाईल. त्यानंतर, ती आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होईल.

प्रभाव:

 

विविध प्रवेश परीक्षा देणाऱ्या  40 लाख विद्यार्थ्यांना एनटीएच्या  स्थापनेमुळे लाभ होईल. सीबीएसई, एआयसीटीई आणि इतर संस्थांना या प्रवेश परीक्षा आयोजित करण्याच्या जबाबदारीतून मुक्त करेल आणि विद्यार्थ्यांची योग्यता, बुद्धिमत्ता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी उच्च विश्वासार्हता, प्रमाणित काठिण्य  पातळी आणेल.

 N.Sapre/S. Kane