Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हैदराबाद मध्ये समुद्र विज्ञान कार्यान्वयनासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याकरिता युनेस्को समवेतच्या कराराला मंत्रिमंडळाची मान्यता


समुद्रविज्ञान कार्यान्वयनासाठी, हैदराबादमध्ये युनेस्कोचे श्रेणी 2आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हिंदी महासागर,हिंदी आणि अटलांटिक महासागरालगतचे आफ्रिकन देश, युनेस्कोच्या ढाच्याअंतर्गत लहान बेटे असलेले देश यांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणे हा या करारामागचा उद्देश आहे. मच्छीमार,आपत्ती व्यवस्थापन , नौवहन, किनारी राज्ये, नौदल, तटरक्षक दल ,पर्यावरण या क्षेत्रात दैनंदिन व्यवहारासाठी, पद्धतशीर समुद्र विज्ञान अभ्यासाद्वारे माहिती पुरवण्याचे काम या समुद्र विज्ञानाद्वारे केले जाते.

या केंद्राच्या स्थापनेमुळे हिंदी महासागरात एक अग्रणी देश म्हणून उभे राहण्यासाठी भारताला संधी मिळणार आहे.हिंदी महासागरालगत असणाऱ्या दक्षिण आशियायी देशांसहित हिंदी महासागरांतर्गत देशांशी सहकार्य वाढवण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. समुद्री आणि किनारी स्थिरतेशी संबंधित मुद्दयांच्या निराकरणासाठी जगभरातल्या तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षमता उभारण्यासाठीची गरज या केंद्रामुळे पूर्ण होणार आहे.

N.Sapre/N.Chitale/P.Kor