Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतात जागतिक उद्योजकता संम्मेलन 2017 च्या सहआयोजनासाठी भारत आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भारतात जागतिक उद्योजकता संम्मेलन 2017 च्या सहआयोजनासाठी भारत आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

या संमेलनामुळे उद्योजक आणि गुंतवणूकदारांना जागतिक स्तरावरील आघाडीच्या उद्योजकांशी संवाद, धोरणात्मक कार्यशाळा यांसह उद्योग जगताशी संबंधित विविध बाबींचा अनुभव घेण्याची संधी प्राप्त झाली. तसेच या संमेलनाने युवा उद्योजक, विशेषत: महिला आणि उपेक्षित वर्गातील उद्योजकांना नव्या संधी प्राप्त करण्यासाठी एक मंच उपलब्ध करुन दिला.

पार्श्वभूमी

हैदराबाद येथे 28 ते 30 नोव्हेंबर 2017 या अवधीत जागतिक उद्योजकता संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात 150 देशांमधील 1,500 पेक्षा जास्त नोंदणीकृत प्रतिनिधी सहभागी झाले. त्यात अनेक नामवंत कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धोरण निर्माते आणि शासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश होता.

***

N.Sapre/M.Pange/Anagha