पीएम्इंडिया
पारा याबाबतच्या मिनामाटा कराराच्या मंजुरीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यतेची मोहोर उमटवली आहे. यामुळे भारत या कराराचा एक पक्ष बनला आहे. पारा सबंधित उत्पादने आणि पारा संयुगे सबंधित प्रक्रियेचा वापर यासाठी 2025 पर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
पारा आणि त्याच्या संयुग उत्स्सार्जनापासून मानवी आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण हा उद्देश समोर ठेवून अविरत विकासासाठी मिनामाटा कराराची अंमलबजावणी केली जाणार आहे. उद्योगांनी, उत्पादन प्रक्रियेत, पाराविरहीत पर्यायी उत्पादनांचा आणि पार विरहीत तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन या करारात करण्यात आले आहे.
BG/NC