Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रशियाच्या राष्ट्रपतींसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे वक्तव्य

रशियाच्या राष्ट्रपतींसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे वक्तव्य

रशियाच्या राष्ट्रपतींसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे वक्तव्य

रशियाच्या राष्ट्रपतींसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे वक्तव्य

रशियाच्या राष्ट्रपतींसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे वक्तव्य

रशियाच्या राष्ट्रपतींसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे वक्तव्य


आदरणीय राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन,
माध्यम सदस्य यांस,

सर्वप्रथम मी रशियाची नागरी विमान दुर्घटना आणि सीरीयामध्ये लष्करी जेट बुडण्याच्या दुर्दैवी घटनेत दगावलेल्यांबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करतो. दु:ख आणि आव्हानाच्या या प्रसंगात आम्ही रशियाच्या जनतेसोबत ठाम उभे आहोत.

माझ्या या भव्य स्वागताबद्दल मी राष्ट्रपतींचे आभार मानतो. आपण भारत-रशियाच्या सामरीक भागीदारीचे शिल्पकारआहात आणि एका परिवर्तनीय विश्वात आपले नेतृत्व आपल्या संबंधांना स्थिर गतीने प्रगती आणि विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल.

राष्ट्रपती महोदय, मला कायम आपल्या सामरीक भागीदारीचा आदर वाटतो. मी नेहमीच या भागीदारीचे कौतुक करीत आलोआहे. रशिया भारतासाठी संरक्षण, विकास आणि कूटनीतीतील यश आणि शक्तीचा स्त्रोत राहिला आहे. आमच्या नागरिकांमध्येही परस्परांबद्दल सद्भावना आणि सन्मानाची भावना आहे.

भविष्यात भारताचे आर्थिक परिवर्तन आणि बहुकेंद्री जगाला एक संतुलीत, स्थिर, समावेशक आकार देणारा एक महत्वपूर्ण भागीदार, म्हणून मी रशियाकडे पाहतो.

गेल्या दोन दिवसात आमच्यात खूपच चांगली चर्चा झाली आहे आणि त्याचे चांगले फलित प्राप्त होण्याची आशा आम्हाला वाटते.

आम्ही भविष्यातील या रणनीतीविषयक सहकार्याच्या चरीत्राची पायाभरणी केली आहे.

मेक इन इंडिया अभियानांतर्गत संरक्षण आघाडीवर भारतात कामोव 226 हेलीकॉप्टर्सच्या निर्मितीबाबतचा आंतर-सरकारी करार हा पहिला प्रकल्प आहे. सुरक्षेच्या क्षेत्रातला हा आमचा अत्यंत महत्वाचा साथीदार आहे.

अन्य काही संरक्षण प्रस्तावांबाबतही आम्ही प्रगती केली आहे. या प्रस्तावांमुळे भारतात संरक्षण पुनर्निर्माणाचे कार्य अधिक दृढ होईल. तसेच यामुळे भारत देश भावी पिढीच्या संरक्षण विषयक सामग्री निर्मितीबाबत अधिक तत्पर राहील.

अणु ऊर्जा क्षेत्रात आमचे सहकार्य वेगाने वाढत आहे. आम्ही दोन ठिकाणी १२ रशियन न्युक्लीयर रिॲक्टर्सच्यायोजनेतही प्रगती केली आहे. आजच्या करारामुळे या रिॲक्टर्समध्ये भारतीय निर्मिती वाढेल. यामुळे माझ्या मेक इन इंडिया अभियानाला अधिक बळ लाभेल. या समर्थनासाठी मी राष्ट्रपती पुतीन यांचे आभार मानतो.

जगातील हायड्रोकार्बनचा सर्वात मोठा साठा असल्यामुळे आणि दृढ सामरीक सहकार्यामुळे रशिया भारतातील उर्जा सुरक्षेचा मुख्य स्रोत असू शकतो. राष्ट्रपती पुतीन यांच्या समर्थनासह आम्ही रशियन हायड्रोकार्बन क्षेत्रात भारतीय गुंतवणुक अधिक वाढवित आहोत.

राष्ट्रपती पुतीन आणि आपण आपल्या आर्थीक संबंधाच्या विस्तारासाठी रचनात्मक पद्धतीने कार्य करीत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या शिखर परिषदेनंतर भारताने पैलु न पाडलेल्या हिऱ्यांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार रशिया आणि भारत यांच्यात थेट व्यापार वाढविण्यासाठी विशेष अधिसूचित क्षेत्राची तरतूद केली आहे. येथून जगातील ९० % पैलु न पाडलेले हिरे प्राप्त होतात.

त्याचबरोबर आम्ही लॉजिस्टिक्स क्षेत्रातही कार्यरत आहोत. आमचा ग्रीन कॉरिडोर प्रोजेक्ट सुरू झाला आहे. इराण द्वारे आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण ट्रांजिट कॉरिडोर मुळे वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचू शकेल.

तसेच आम्ही भारत-युरेशियाई आर्थिक संघ मुक्त व्यापार करारातही पुढे जात आहोत. मध्य आशियालासुद्धा याचा लाभ मिळेल.

त्याचबरोबर आम्ही आमच्या खाजगी क्षेत्रांना परस्पर सहकार्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. यासाठी आम्ही एका सीईओ मंचाची उत्तम बैठक सुद्धा तयार केली आहे. द्विपक्षीय गुंतवणुक आणि व्यापार जलद गतीने वाढताना दिसेल, असा विश्वास मला आजच्या करार आणि घोषणांमुळे वाटू लागला आहे.

आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ करण्याप्रती मी आणि राष्ट्रपती पुतीन संपूर्णत: वचनबद्ध आहोत.

संयुक्त राष्ट्रसंघातही आम्ही चांगले सहकारी आहोत. ब्रिक्स, पूर्व आशिया शिखर परिषद, जी 20 आणि आता शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यत्वाने आमच्या सहकार्याला वैश्विक परिमाण लाभले आहे. मध्य आशिया आणि अफगाणिस्थानसह यूरेशियापासून एशिया –प्रशांत महासागर हे सहकार्य महत्वपूर्ण आहे.

दहशतवादी समूह आणि त्यांचे लक्ष्य असणाऱ्या देशांनी कोणताही भेदभाव किंवा अंतर न बाळगता एकजूट होऊन संपूर्ण जगाने दहशतवादाशी लढा दिला पाहिजे, याबाबत आमच्यात सहमती झाली आहे.

मध्य आशियामध्ये स्थैर्यासाठी चर्चेद्वारे राजकीय स्तरावर कराराची आवश्यकता आहे, याबाबतही आम्ही सहमत आहोत.

एका वर्षात दोन वेळा रशियामध्ये येउन मला आनंद झाला. आता मी राष्ट्रपती पुतीन यांना ब्रिक्स शिखर परिषद आणि वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतात येण्याचे आमंत्रण देतो.

धन्यवाद.

M.Pange/I.Jhala/M.Desai