Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोरियातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

कोरियातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


कोरिया प्रजासत्ताकातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत-कोरिया व्यवसाय परिषदेसाठी ते नवी दिल्लीत आले आहेत.

दोन्ही देशांमधले व्यवसाय सहकार्य वाढवण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. कोरियातल्या उद्योग कंपन्यांची नैतिकता आणि व्यावसायिकता यामुळे कोरियन ब्रॅण्डसच्या वस्तूंनी भारतातल्या घराघरात जागा मिळवली आहे अशा शब्दात कोरियातल्या उद्योग कंपन्यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

भारतात तसेच “मेक इन इंडिया” मध्ये गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी कोरियातल्या कंपन्यांना यावेळी केले. यात “मेक फॉर इंडिया” ही अभिप्रेत आहे. कोरियातील प्रमुख उद्योग कंपन्या कोरियाप्रमाणेच भारतातही समूह म्हणून गुंतवणूक करण्याचा विचार करु शकतात, असे पंतप्रधानांनी सुचवले.

S.Kulkarni/S.Tupe/M.Desai