Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी पारादीप रिफायनपरी राष्ट्राला अर्पण केली

पंतप्रधानांनी  पारादीप रिफायनपरी राष्ट्राला अर्पण केली

पंतप्रधानांनी  पारादीप रिफायनपरी राष्ट्राला अर्पण केली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशा येथे अत्याधुनिक पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्प राष्ट्राला अर्पण केला.

यावेळी मोठया संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, की विकासाशी संबंधित एखाद्या अधिकृत कार्यक्रमाला इतक्या मोठया संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल प्रशंसा करतो.

ओदिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले की पारादीप आता ओदिशाच्या लोकांसाठी “विकास द्वीप” बनेल. रोजगाराच्या संधीमुळे युवकांना फायदा होईल आणि देशभरातील गरीब महिला, ज्या इंधनासाठी लाकूड फाटयावर अवलंबून आहेत त्यांना स्वयंपाकाचा गॅस उपलब्धा होईल, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की मुद्रा आणि स्टार्ट अप भारत सारख्या सरकारी उपक्रमांमुळे युवकांना लाभ होत आहे.

उद्‌घाटनस्थळी पोहचण्यापूर्वी पंतप्रधानांनी मुख्य नियंत्रण कक्ष आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधण्यात आलेल्या इंडमॅक्स युनिटची पाहणी केली. ते म्हणाले की या प्रकल्पातील इंडमॅक्स उत्पादन क्षमता हे मेक इन इंडिया उपक्रमाचे उदाहरण आहे.

S.Kane/S.Tupe/M.Desai