Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रियाध इथे भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेले संबोधन

रियाध इथे भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेले संबोधन


माझ्या प्रिय देशबांधवानो, सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर मी आलो आहे. भारत सध्या ज्या पध्दतीने आर्थिक प्रगती करत आहे, त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. सव्वाशे कोटी लोकांचा देश जगाला खूप काही देऊ शकतो आणि विश्वासाठी बरेच काही करुही शकतो. लोकशाही मूल्यांची जपणूक करत, सबका साथ, सबका विकास अर्थात सर्वांच्या सहकार्याने सर्वांचा विकास हा मूलमंत्र घेऊन भारत जो प्रयत्न करत आहे, त्यामुळे मानवी मूल्यांवर विश्वास बाळगणाऱ्या जगतासाठी एक नवा विश्वास, नवी आशा पल्लवित झाली आहे. अल्पावधीतच भारताने जगात पुन्हा एकदा नवी आशा निर्माण केली आहे. याआधी आपणही अनेक देशांपैकी एक होतो आज एक महत्वाचा देश म्हणून भारताकडे जग पहात आहे. त्याचे एक कारण म्हणजे हिंदुस्थानमधले राजकीय स्थैर्य, साधारण 30 वर्षानंतर पूर्ण बहुमत असलेलं सरकार सत्तेवर आलं आहे. संपूर्ण जग आर्थिक संकटात सापडलं असताना आयएमएफ, जागतिक बँक आणि पतमानांकन संस्थांसह प्रत्येक जण आर्थिक जगतातला एक आशेचा किरण म्हणून भारताकडे पहात आहे. एक चमकता तारा म्हणूनही काहीजण भारताला पाहतात. विपरित परिस्थितीतही भारतात विकासाची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. भारताची तिसरी सर्वात मोठी ताकद आहे, आठशे दशलक्ष, 35 वर्षापेक्षा कमी वर्षांचा युवा वर्ग, संपूर्ण जगाला अशा मनुष्यबळाची गरज भासेल जे कौशल्यपूर्ण असेल, आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असेल, आणि भारत या दिशेने वेगाने आगेकूच करत आहे, कृषी क्षेत्र असो, औद्योगिक क्षेत्र असो, सेवा क्षेत्र असो तीनही क्षेत्रात भारत दमदार पावले टाकत वाटचाल करत आहे.

आपणा सर्वांना भेटण्याची संधी मला मिळाली, आपणा सर्वांना माझ्याकडून अनेक शुभेच्छा. धन्यवाद.

N.Chitle /I.Jhala / M. Desai