पीएम्इंडिया
भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबी आणि अबुधाबीच्या वित्तीय सेवा नियामक प्राधिकरणा दरम्यान परस्पर सहकार्य आणि तांत्रिक सहाय्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
या सामंजस्य करारामुळे करारावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या दोन्ही पक्षांना आर्थिक संपर्क आणि सहयोग वाढविणे शक्य होणार आहे. दोन्ही देशांमध्ये प्रतिभूती बाजार विकसित करण्याच्या दृष्टीनेही हा करार सहाय्यक ठरेल. तसेच दोन्ही नियामकांमध्ये माहितीच्या रचनेचे आदान-प्रदान करण्याच्या दृष्टीने हा करार उपयुक्त ठरणार आहे.
M.Pange/B.Gokhale