पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, देशातील 10 प्रमुख क्षेत्रांसाठी उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (PLI) योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली. आत्मनिर्भर भारत अंतर्गत, भारताच्या उत्पादन क्षमता आणि निर्यात क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही 10 क्षेत्रे खालीलप्रमाणे:-
|
प्रगत रसायनशास्त्र, सेल (एसीसी) बैटरी |
नीती आयोग आणि अवजड उद्योग विभाग |
18100
|
|
इलेक्ट्रॉनिक/तंत्रज्ञान उत्पादने |
इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय |
5000 |
|
ऑटोमोबाईल, आणि ऑटो-सुटे भाग |
अवजड उद्योग विभाग |
57042
|
|
औषधनिर्माण क्षेत्र |
औषधनिर्माण विभाग |
15000
|
|
टेलिकॉम आणि नेटवर्किंग उत्पादने |
टेलिकॉम विभाग |
12195 |
|
वस्त्रोद्योग उत्पादने: एमएमएफ विभाग आणि तांत्रिक वस्त्रोद्योग |
वस्त्रोद्योग मंत्रालय |
10683
|
|
अन्नपदार्थ |
अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय |
10900
|
|
उच्च क्षमतेचे सोलर पीव्ही मोड्यूल्स |
नवीन आणि अक्षय उर्जा मंत्रालय |
4500 |
|
घरगुती वापराच्या इलेक्ट्रोनिक्स वस्तू (एसी आणि एलएडी) |
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग |
6238
|
|
विशेष प्रकारचे पोलाद |
पोलाद मंत्रालय |
6322
|
|
|
एकूण |
145980
|
प्राधान्यक्रम क्षेत्रे | अंमलबजावणी मंत्रालय/विभाग | पाच वर्षांसाठी मान्यताप्राप्त निधी तरतूद (कोटींमध्ये) |
|---|
विविध मंत्रालये आणि विभागांमार्फत, दिलेल्या निधीच्या तरतुदीअंतर्गत पीएलआय योजना राबवली जाईल. प्रत्येक क्षेत्रात उत्पादन-संलग्न प्रोत्साहन योजनेच्या अंमलबजावणीच्या अंतिम प्रस्तावाचे मूल्यमापन व्यय वित्त समितीतर्फे केले जाईल आणि मंत्रिमंडळ त्या प्रस्तावाला मंजुरी देईल. जर मंजूर निधीतून काही बचत झाली, तर तो निधी इतर मान्यताप्राप्त क्षेत्रांसाठी वापरला जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही नव्या क्षेत्राला मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक असेल.
उत्पादन-संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे ही प्रमुख दहा क्षेत्रे जागतिक पातळीवर स्पर्धेसाठी सज्ज होतील, या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढेल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल. कार्यक्षमता वाढेल, अर्थव्यवस्थेचा विकास होईल,निर्यातीत वाढ होईल आणि पर्यायाने भारत, जागतिक पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग बनू शकेल.
यापूर्वी अधिसूचित झालेल्या उत्पादन-संलग्न प्रोत्साहन योजनेत समाविष्ट असलेल्या क्षेत्रांमध्ये वरील दहा क्षेत्रांची वाढ होईल.
आधीची क्षेत्रे बघण्यासाठी खाली दिलेला तक्ता बघावा.
|
No. |
Sectors |
Implementing Ministry/Department
|
Financial outlays Rs. crore
|
|
1 |
Mobile Manufacturing and Specified Electronic Components
|
MEITY |
40951 |
|
2 |
Critical Key Starting materials/Drug Intermediaries and Active Pharmaceutical Ingredients |
Department of Pharmaceuticals |
6940 |
|
3 |
Manufacturing of Medical Devices.
|
|
3420 |
|
|
|
Total |
51311 |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारत घोषणेअंतर्गत, देशातील उत्पादन क्षेत्राला अधिक कार्यक्षम, संतुलित आणि लवचिक बनवण्याची धोरणे अपेक्षित आहेत. उत्पादन क्षेत्रात वाढ आणि औद्योगिक मालाच्या निर्यातीत वाढ झाल्यास, जागतिक पातळीवर भारतीय उद्योगक्षेत्रांना मोठा वाव आणि संधी मिळेल. त्यातून भारताची अधिकाधिक संशोधन आणि नवोन्मेषाची क्षमता वाढेल. उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन आणि देशात उत्पादन क्षेत्र व्यवस्थेसाठी पोषक वातावरण तयार केल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीचे एकात्मीकरण तर शक्य होईलच,त्याशिवाय , त्याचा लाभ एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रालाही होईल. यामुळे देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल आणि मोठी रोजगारनिर्मिती होईल.
क्षेत्रनिहाय उत्पादनांची यादी बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
Jaydevi.P.S/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
Cabinet decision of PLI scheme for 10 sectors will boost manufacturing, give opportunities to youth while making India a preferred investment destination. This is an important step towards improving our competitiveness & realising an Aatmanirbhar Bharat. https://t.co/KDQvMEBubJ
— Narendra Modi (@narendramodi) November 11, 2020