Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग आणि निरोगी वृद्धत्वावरील एक लेख केला सामायिक


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

या लेखात एक अधिक मजबूत आणि विकसित राष्ट्र घडवण्यासाठी नागरिकांनी जीवनाच्या सर्व टप्प्यांवर निरोगी, सक्रिय आणि उत्पादक राहावे हे सुनिश्चित करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला आहे. भारताच्या शाश्वत ज्ञान परंपरेत रुजलेला योग आरोग्यासाठी एक समग्र दृष्टिकोन प्रदान करतो तसेच निरोगी वृद्धत्वाला साहाय्य करणारा आयुष्यभराचा सोबती म्हणून काम करतो, यावरही लेखात भर देण्यात आला आहे.

‘X’ या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे;

जागतिक योग दिन 2026 साजरा करण्याच्या तयारीत असताना, केंद्रीय राज्यमंत्री श्री @mpprataprao यांनी एक अधिक मजबूत आणि विकसित राष्ट्र घडवण्यासाठी नागरिक जीवनाच्या सर्व टप्प्यांवर निरोगी, सक्रिय आणि उत्पादक राहतील हे सुनिश्चित करण्याच्या गरजेबद्दल लिहिले आहे.

ते यावर जोर देतात की, भारताच्या शाश्वत ज्ञान परंपरेत रुजलेला योग, आरोग्यासाठी एक समग्र दृष्टिकोन प्रदान करतो आणि निरोगी वृद्धत्वाला साहाय्य करणारा आयुष्यभराचा सोबती म्हणून काम करतो.

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]