पीएम्इंडिया
अंधांसाठीच्या टी-20 क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या सदस्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संघाच्या कामगिरीची प्रशंसा करतानाच भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. या खेळाडूंची एकाग्रता आणि त्यांच्या विशेष कौशल्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. या खेळाडूंची कामगिरी, दिव्यांगाबरोबरच लाखो लोकांसाठी स्फूर्तिदायी असल्याचे प्रशंसोद्गार पंतप्रधानांनी काढले. संघाच्या सदस्यांनी पंतप्रधानांचे नाव असलेली संघाची जर्सी, स्वाक्षरी केलेली बॅट आणि चेंडू पंतप्रधानांना भेट दिल्यात.
पंतप्रधानांनीही स्वाक्षरी केलेली बॅट आणि चेंडू संघाला भेट म्हणून दिला.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor