पीएम्इंडिया
भारतामध्ये जागतिक औद्योगिक केंद्र बनण्याची अफाट क्षमता आहे. या क्षमतांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक जर्मन कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज हनोवर औद्योगिक व्यापार प्रदर्शनाचे संयुक्तपणे जर्मनीच्या चॅन्सलर अंजेला मर्केल यांच्याबरोबर उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘मेक इन इंडिया’सह अन्य विविध योजनांची माहिती दिली. भारतात व्यापार सुलभपणे करता यावा यासाठी अर्ज प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. तसंच कर प्रणालीत पारदर्शकता आणली आहे. ‘मूडी’ या पतमानांकन संस्थेने अलिकडेच भारताला ‘सकारात्मक’ मानांकन दिल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनातील भारतीय कक्षाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले