Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अधिकृत दौऱ्यासाठी पंतप्रधानांचे घानामध्ये आगमन

अधिकृत दौऱ्यासाठी पंतप्रधानांचे घानामध्ये आगमन


नवी दिल्ली, 2 जुलै 2025

घाना देशाच्या अधिकृत दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अक्रा येथे पोहोचले. विमानतळावर घानाचे अध्यक्ष एच ए जॉन ड्रामानी महामा यांनी पंतप्रधानांचे सन्मानपूर्वक स्वागत केले. यामधून दोन्ही देशांमधील मजबूत आणि ऐतिहासिक मैत्रीच्या बंधांना उजाळा मिळाला. 

पंतप्रधानांची घानाला भेट ही गेल्या तीन दशकातील अशी पहिलीच भेट आहे. या प्रकारच्या ऐतिहासिक भेटीतून भारत आणि घानामधील भागीदारी अधिक दृढ होऊन आफ्रिका तसेच जागतिक पटलावरील दक्षिणेकडील सहकारी देशांशी संबंध दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला अधोरेखित करेल.

S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai