Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अफगाणिस्तान-पाकिस्तान भागात झालेल्या जोरदार भूकंपात सर्वजण सुखरुप राहावेत अशी पंतप्रधानांकडून प्रार्थना


अफगाणिस्तान-पाकिस्‍तान प्रांतात झालेल्या जोरदार भूकंपात सर्वजण सुखरुप राहावेत अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. भूकंपामुळे झालेल्या हानीचा तातडीने आढावा घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तानसह कुठेही मदतीची गरज आहे तिथे भारत तत्परतेने ती करेल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

“अफगाणिस्तान-पाकिस्तान भागात बसलेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्याविषयी ऐकलं, या भूकंपाचे हादरे भारताच्या काही भागातही जाणवले. सर्वजण सुखरुप राहावेत अशी माझी प्रार्थना आहे. भूकंपातल्या नुकसानीचा तातडीने आढावा घ्यावा असे आवाहन करतानाच अफगाणिस्तान, पाकिस्तानसह जिथे मदतीची आवश्यकता असेल तिथे मदतीसाठी भारत तयार आहे”, असे पंतप्रधानांनी सांगितले.

N.Chitale/S.Tupe/N.Sapre